breaking-newsपिंपरी / चिंचवड

चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये स्वतंत्र भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे संस्थापक संदीप काटे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून सामुदायिक राष्ट्रगीत गायन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थितांची मने जिंकली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे अतुल पाटील, मिलींद खडके तर पालक अतिथी सुरेश जाधव, रेश्मा मूलमाने, वैशाली पाटील, मोनाली खडके आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या स्वतंत्र्याचा इतिहास सांगून मार्गदर्शनपर भाषणे केली.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर केली. विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून पालक तसेच गुरूजणांनी त्यांचे कौतुक केले. तसेच, शाळेचे संस्थापक संदीप काटे, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, शाळेच्या समन्वयक रजनी घुगे, पूर्व प्राथमिक विभाग समन्वयक पलक गांधी आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे खाऊ वाटप करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button