breaking-newsआंतरराष्टीय

“इब्सा’मध्ये परस्परांमधील सहकार्य वाढवण्याचा निर्णय

प्रीटोरिया – “इब्सा’ गटामध्ये परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्णय आज या गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. भारत, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांचा सहभाग असलेल्या “इब्सा’ या गटामध्ये विकास आणि दक्षिण- दक्षिण सहकार्याबाबत अधिक सामंजस्याचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र संबंध आणि सहकार्य विषयाच्या मंत्री लिंडीवे सिसुलू आणि ब्राझिलचे परराष्ट्र मंत्री मार्कोस गालवाओ यांची “इब्सा’दरम्यान अनौपचारिक काल बैठक झाली असे संयुक्‍तपणे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. या चर्चेदरम्यान विकास सहकार्य आणि दक्षिण -दक्षिण सहकार्याबबत परस्पर मतांचे आदानप्रदान झाले, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.

“इब्सा’च्या मंत्र्यांनी विकासासाठी व्यापक सामंजस्यासंदर्भात दक्षिण- दक्षिण सहकार्याविषयीच्या जाहीरनामा स्वीकारला आहे. “इब्सा’ने “ग्लोबल साऊथ’ला केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशकता, न्यायसाम्य आणि संपर्काचे तत्व अनुसरले आहे. असे “इब्सा’च्या दक्षिण-दक्षिण सहकार्याविषयीच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button