breaking-newsआंतरराष्टीय

स्वार्थी व्यापार नितीला ब्रिक्‍स देश करणार विरोध

प्रिटोरिया – अमेरिकेसह जगातील काही प्रगत देश स्वार्थीपणाने त्यांची व्यापार निती राबवत आहेत. काही वेळेला जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वांच्या विरोधातही त्यांच्याकडून कृती होत आहे. त्याला प्रखर विरोध करण्याचा निर्णय ब्रिक्‍स संघटनेच्या देशांनी घेतला आहे. ब्रिक्‍स ही ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका या देशांची संघटना आहे.

वेगाने विकसित होणाऱ्या देशांची संघटना म्हणून ही संघटना ओळखली जाते. या देशांच्या विदेश मंत्र्यांची एक परिषद सध्या येथे सुरू आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या परिषदेला उपस्थित आहेत. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जागतिक पातळीवरील मार्केटिंगच्या विषयात विकसनशील देशांना जादा प्रतिनिधीत्व मिळावे आणि त्यांचे त्यात मोठे योगदान असावे यासाठी ही संघटना आता प्रयत्न करणार आहे. जागतिक अर्थव्यवस्था ही खुली आणि सर्वसमावेशक असावी असे मत सदस्य देशांच्या मंत्र्यांनी या परिषदेत मांडले.

संघटनेच्या बैठकीनंतर जे निवेदन प्रसिद्धीला देण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की जगतिक व्यापार संघटनेला जी तत्वे अपेक्षित आहेत त्यानुसार जागतिक व्यापारात पारदर्शकता, समानता, आणि बहुविध व्यापार याचा पुरस्कार केला जावा. जागतिक व्यापाराच्या अनुषंगाने जो आर्थिक विकास अपेक्षीत आहे त्याचा सर्वांनाच समान पद्धतीने लाभ होणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादनही या निवेदनात करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button