breaking-newsआंतरराष्टीय

चीनची ऐतिहासिक कामगिरी; चंद्रावर उगवले कापसाचे बियाणे

चीनने अंतराळात आणखी एक मैलाचा दगड रोवला आहे. चीनला चंद्रावर कापसाचे बियाणे उगविण्यात यश मिळाले आहे. चंद्रावर उगविण्यात आलेला हा जगातील पहिला जैविक घटक आहे. चीनच्या महत्वकांक्षी ‘चांग ई-४ ’ मिशनसोबत कापसाबरोबर इतर बियाणे देखील पाठविण्यात आले होते. मात्र, यापैकी कापसाचे बियाणला कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमेसाठी हे ऐतिहासिक यश मानले जात आहे.

नवीन वर्षात ३ जानेवारी रोजी चीनने ‘चांग ई -४’ हे यान पृथ्वीवरून न दिसणाऱ्या चंद्राच्या बाजूवर उतरविण्याचा कारनामा करून दाखविला होता. या महत्वकांक्षी मोहिमेसोबत चंद्राच्या भूगर्भशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही उपकरण पाठवून देण्यात आले होते. यानंतर लागलीच याठिकाणी पहिला जैवप्रयोग करण्यात आला.

‘चांग ई -४’ या मोहिमेसोबत वैज्ञानिकांनी बकेट सारखा एक विशेष धातूचा डब्बा पाठवून दिला होता. यामध्ये माती, पाणी व हवेची व्यवस्था करण्यात आलेली होती. तर कापूस, रेपसीड, बटाटा, अरबीडॉप्सिसच्या बियाणांबरोबर मधमाशांचे अंडे व किन्व पाठवून देण्यात आले होते. या घटकासोबत चंद्रावर करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये यश आले. इतर बियाणे वगळता फक्त कापूसाचे बियाणे उगविण्यास सुरूवात झाले आहे.

#BREAKING The latest released experimental picture shows that cotton seeds carried on the Chang’e-4 probe have sprouted, marking the first biological experiment on the lunar surface #ChangE4 pic.twitter.com/6bMXH3dVT0

— CGTN (@CGTNOfficial) January 15, 2019

अंकुरलेल्या कापसाच्या बियाणाचे १७० हून अधिक छायाचित्र यानाकडून टिपण्यात आले आहेत. चंद्रावर मानवाकडून करण्यात आलेला हा पहिला जैविक प्रयोग आहे, असे चीनमधील सत्ताधारी पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. यासोबत त्याचे एक छायाचित्र देखील जारी करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button