breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनराजकारण

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा अखेर लग्नबंधनात अडकले

Raghav Chadha and Parineeti Chopra Wedding : आपचे नेते राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’ मध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

परिणीतीने तिच्या सोशल मीडियावर लग्नाते फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिलं, नाश्त्याच्या टेबलवरील पहिल्या गप्पांपासूनच आम्हाला माहीत होतं की आम्ही एकमेकांसाठीच आहोत. या दिवसाची प्रतीक्षा आम्ही खूप काळापासून केली. अखेर आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहोत. आम्ही एकमेकांशिवाय राहू शकलो नसतो. इथपासून आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.

हेही वाचा – गणपतीच्या दोन लग्नांची आख्यायिका तुम्हाला माहीत आहे का?

दरम्यान, राघव आणि परिणीती ३० स्पटेंबरला आणखी एक रिसेप्शन देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. हे रिसेप्शन चंडिगढमध्ये देण्यात येणार असून यात त्यांचे नातेवाईक सहभागी होणार आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button