breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी केंद्राच्या नविन गाईडलाईन्स जारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राने चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरण सुरु करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर यांनी याबाबतची माहिती दिली.

चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाची देशामध्ये पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिल्यानं अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे जावडेकरांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.


चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी केंद्राच्या गाईडलाईन्स काय आहेत ते पाहुयात

  • कॅमेरासमोरील कलाकार वगळता इतर सर्वांना मास्क घालणे अनिवार्य
  • प्रत्येक ठिकाणी कमीत कमी ६ फूट अंतर राखणे बंधनकारक
  • मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्टला पीपीई किट घालणे गरजेचे
  • विग, कॉस्ट्यूम आणि मेकअप यांची शेअरिंग कमीत कमी करा.
  • शेअर होणाऱ्या गोष्टींचा वापर करताना ग्लोव्हज घालणे गरजेचे
  • माईकचे डायफ्रामसोबत सरळ संपर्क करु नये.
  • प्रॉप्सचा वापर कमीत कमी करावा. त्यानंतर ते सॅनिटाईज करा.
  • कमीत कमी व्यक्तींमध्ये शूटींग करावं.
  • आऊटडोअर शूटिंग करताना स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे
  • शूटिंगदरम्यान entry आणि exit करण्यास वेगवेगळी जागा असावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button