breaking-newsराष्ट्रिय

मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबादारीतून मुक्त करा – सोनिया गांधी

नवी दिल्ली कॉंग्रेसेच्या हंगामी अध्यक्षपदावरुन सध्या कॉंग्रेसमध्ये गोंधळ सुरु आहे. मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतुन मुक्त करा आणि नेतृत्व निवडीची प्रक्रिया सुरु करा, अशा सुचना सोनिया गांधी यांनी पक्षाच्या कार्यकारणीला दिल्या आहेत. आज (२४ ऑगस्ट) कॉंग्रेसच्या कार्यकारणीची बैठक व्हर्चुअली सुरु झाली आहे. दरम्यान, माजी संरक्षणमंत्री ए.के,अँटनी यांना अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?

देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button