breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अखेर ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर प्रदर्शित

 

मुंबई – भारत पाकिस्तान युद्ध, जिहाद, दहशतवादी संघटना, धार्मिक दंगली यांसारख्या मुद्द्यांचा समावेश असलेली ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोज वाजपेयीने अनेकांची मने जिंकली होती. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनचे बरेच कौतुक झाले होते. त्यानंतर आता लवकरच या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ रोजी ऍमेझॉन प्राइमवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार होती. परंतु कोरोना संकटामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार आता ही सीरिज ४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. मनोज वाजपेयी आणि समंथासोबत प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

दरम्यान, ट्रेलरमध्ये ‘फॅमिली मॅन’ अर्थात श्रीकांत तिवारीची कथा दाखवण्यात आली आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सीरिजच्‍या ९ भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच देशाचे घातक हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहायला मिळणार आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button