breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड मतदारसंघात आमदार जगतापांनी सुरू केलेल्या “आपली हेल्पलाइन”ला नागरिकांचा प्रतिसाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सुरू केलेल्या “आपली हेल्पलाइन”ला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. हेल्पलाईनवरील समस्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेसह इतर शासकीय यंत्रणा दखल घेऊन योग्य निपटारा करत आहेत. त्यामुळे “आपली हेल्पलाइन”वर (7507411111) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सामान्यांचा विश्वास वाढत आहे.

महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी व इतर सरकारी कार्यालयेही त्याला अपवाद नाहीत. रस्त्याच्या कडेला असलेली विद्युत दिवे न लागणे, कधी-कधी दिवसाही सुरू असणे, डीपी बॉक्स उघडे असणे, गटारी उघड्या असणे, ते वारंवार तुंबणे, डासांच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष, भटक्या कुत्र्यांचा त्रास, रस्त्यांवरील खड्डे, पिण्याच्या पाण्याचा कमी दाबाने पुरवठा, पदपथांची दुरवस्था यांसह अनेक छोट्या मोठ्या समस्यांचे चित्र शहरात सार्वत्रिक पाहायला मिळते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सामान्यांना भेडसावणाऱ्या या समस्यांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी या मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप सरसावले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आमदार जगताप यांनी “आपली हेल्पलाइन” सुरू केली आहे. मतदारसंघातील नागरिकांनी 7507411111 या मोबाईल क्रमांकांवर एखादी समस्या मांडल्यानंतर त्याचा शासकीय पातळीवरून त्वरित निपटारा करण्यात येत आहे. चोवीस तास सुरू राहणाऱ्या या “आपली हेल्पलाइन”वर आपल्या भागातील समस्या व्हॉट्सअप केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेतली जाते.

चिंचवड मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारी किंवा समस्या सोडविण्यासाठी महिनाभरापूर्वी “आपली हेल्पलाइन” सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना ते राहात असलेल्या भागात अगदी छोट्या छोट्या समस्या भेडसावत असतात. त्या संबंधितांकडे मांडल्यानंतर सुटतीलच याची खात्री नसते किंवा समस्या सोडविण्यासाठी खूप वेळ लावले जाते. अनेकदा त्याची दखलही घेतली जात नाही. त्यामुळे समस्या मांडावी तरी कोणाकडे या गोंधळात नागरिक असतात. नागरिकांमध्ये हा गोंधळ उडू नये आणि त्यांना घरबसल्या आपली समस्या मांडता यावी आणि ती सोडविता यावी यासाठी चिंचवड मतदारसंघातील नागरिकांसाठी “आपली हेल्पलाइन” सुरू केली आहे.

  • आमदार लक्ष्मण जगताप, भारतीय जनता पार्टी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button