breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंत्र्यांची झाडाझडती

दिल्ली | महाईन्यूज

भाजप पुन्हा सत्तेवर येऊन सहा महिने उलटले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रालय व मंत्र्यांच्या कामगिरीची शनिवारी प्रदीर्घ बैठकीत झाडाझडती घेतली असून त्यात ज्यांची कामगिरी निराशाजनक असेल त्यांना मंत्रिमंडळातून काढले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये व सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत मंत्रालयांना सादरीकरण करण्यास सांगण्यात आलेले होते.

सरकारने जे निर्णय घेतले होते त्यांच्या अंमलबजावणीसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या तसेच नावीन्यपूर्ण कोणते उपक्रम राबवण्यात आले याचा आढावा या वेळी घेण्यात आलेला आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी या मुद्दय़ांवरून देशभरात आंदोलन सुरू असताना मंत्रालयांच्या कामगिरीची झाडाझडती घेण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button