breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध

सांगवी कर संकलन कार्यालयात मनसेचे आंदोलन

पिंपरी | प्रतिनिधी

सांगवी कर संकलन कार्यालयामध्ये गेली दीड महिन्यापासून प्रशासन अधिकारी उपलब्ध होत नाहीत. नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध केला आहे. संबंधित कार्यालयाला भेट देऊन जाब विचारण्यात आला. त्याचबरोबर तेथील प्रशासन अधिकाऱ्याच्या खुर्चीला पुष्पहार वाहून त्या खुर्चीचा प्रतीकात्मक सत्कार करून निषेध करण्यात आला.

या वेळेस मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, सुरेश सकट, विशाल पाटील, महेश केदारी, मंगेश भालेकर, अलेक्सनडर मोझेस, अनिल भुजबळ, प्रदीप गायकवाड, राकेश रावल, गणेश माने, रुस्तम इराणी आदी पदाधिकारी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

गेले दीड महिने अनेक नागरिकांच्या मनसेकडे असंख्य तक्रारी येत आहेत. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निळख येथील नागरिक या ढिसाळ कारभाराला त्रस्त झाले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तिथे वारंवार भेट देऊन सुद्धा हेच चित्र पहावयास मिळत होते. अखेर संबंधित अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीचा प्रतिकात्मक रूपाने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यापुढे जर कायमस्वरूपी प्रशासन अधिकारी मिळाला नाही. तर मनसेच्या वतीने अधिकारी मिळेपर्यंत पिंपरी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button