breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमधून 19 उमेदवारांनी भरले 28 अर्ज

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिध

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी अर्ज भरले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातून एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांनी तब्बल 28 उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केले आहेत.

चिंचवड विधानसभा मतदार संघातून 19 उमेदवारांचे 28 अर्ज दाखल झाले आहेत. लक्ष्मण जगताप (भाजप), शंकर पांडुरंग जगताप (भाजप), राहूल कलाटे (अपक्ष), प्रशांत शितोळे (राष्ट्रवादी), धर्मपाल तंतरपाळे (अपक्ष), सुरज खंडारे (अपक्ष), नितिश लोखंडे (जनहित लोकशाही पार्टी), डॉ. मिलींदराजे भोसले (अपक्ष), महावीर उर्फ अजित संचेती (भारतीय राष्ट्रवादी पार्टी), राजेंद्र काटे (अपक्ष), राजेंद्र लोंढे (बहुजन समाज पार्टी), जावेद रशिद शेख (अपक्ष), कैलास परदेशी (अपक्ष), विजय वाघमारे (बहुजन समाज पार्टी), एकनाथ जगताप (बहुजन मुक्ती पार्टी), रविंद्र पारधे (अपक्ष), प्रकाश घोडके (वंचित बहुजन आघाडी), राजकुमार परदेशी (जनता पार्टी), छायावती देसले (भारतीय शेतकरी कामगार पक्ष) यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button