breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

चालाक ड्रायव्हर! माजी आमदाराची आई 10 हजारांचा चेक द्यायची, ड्रायव्हर शून्य वाढवून 1 लाख रुपये काढायचा; महिलेच्या मृत्यूनंतर 5 लाखांची फसवणूक उघड

पंजाब: पंजाबच्या जालंधरमधून 5.15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. येथील माजी आमदार अविनाश चंद्र कलेर यांच्या ड्रायव्हरने मोठ्या चलाखीने आपल्या मालकाच्या आईच्या खात्यातून हे पैसे काढलेले आहेत. माजी विधायक आपल्या आईच्या मृत्यूनंतर बँक स्टेटमेंट पाहत असताना हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यांनी आपल्या ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

अविनाश चंद्र कलेर यांनी पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर रोजी त्यांची आई भागदेवी यांचे निधन झाले. अलीकडेच ते आईच्या सिंडिकेट बँकेच्या खात्याचे स्टेटमेंट पाहत होते. त्या खात्यातून मे 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान साडे 5 लाख काढल्याचे समोर आले. परंतु आईला इतक्या पैशांची कधीच आवश्यकता पडली नाही. चेकबुक पाहिले असता रेकॉर्ड पेजवर फक्त 35 हजार रुपये काढल्याचा तपशील भरला होता. पाच वेळा धनादेश भरून पैसे काढण्यात आले आहेत.

कलेर यांनी सांगितले की, आई कमी शिक्षित होती. तिला फक्त सही कशी करावी हे माहित होते. आईचे सर्व कामे त्यांचा ड्रायव्हर लखविंदर सिंह करत होते. बँकेतून तीन वेळा एक-एक लाख, एक वेळा 2 लाख आणि एक वेळा 50 हजार रुपये काढले होते.

अविनाश यांनी सांगितले की, आरोपी लखविंदरने पोलंडला जात असल्याचे कारण सांगत काम सोडले होते. मात्र तो कुठेही गेला नाही. आईने साडे 5 लाख रुपये का काढले याबाबत चौकशी केली असता लखविंदरकडे कोणतेही उत्तर नव्हते. लखविंदरच भागदेवी यांचे पैसे काढण्यासाठी जात होता असे पोलिस तपासात समोर आले. भागदेवी जर 10 हजार रुपये काढण्यास सांगितले तर तो चेकवर त्यांच्यासमोर 10 हजार रुपये भरायचा, मात्र नंतर एक शून्य वाढवत एक लाख रुपये काढायत होता. चेकबुकवर रेकॉर्डच्या पानावर 10 हजार रुपये लिहीत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button