breaking-newsराष्ट्रिय

चार वर्षांत 1 कोटी रोजगार निर्मिती – नितीन गडकरी

नवी दिल्ली – चार वर्षांत 1 कोटी जणांना रोजगार दिल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता नितीन गडकरीही रोजगाराच्या मुद्‌द्‌यावर सरकारचा बचाव करायला उतरले आहेत.
भाजपा सरकारने लाखो रोजगार निर्माण केले आहेत, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याला दुजोरा देत; माझ्या अखत्यारीतील विभागांनीच गेल्या चार वर्षांत एक कोटीपेक्षा अधिक युवकांना रोजगार दिले आहेत, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग, जहाज परिवहन आणि नदी विकास आदी महत्त्वाची खाती आहेत.

1,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे तेव्हा 50 हजार ते 1 लाख रोजगारांची निर्मिती होते. माझ्या विभागाने 10 लाख कोटी रुपयांच्या परियोजनांचे ठेके दिले आहेत. सरकारी सल्लागार संस्था वाक्‍पोस लिमिटेडच्या 50 व्या स्थापनादिनानिमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते.

रस्ते त्याचप्रमाणे इमारती निर्मितीसाठी लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती दुप्पट झालेली आहे. सिमेंट उद्योगही वाढत आहे. त्यामुळे या उद्योगांशी संबंधित व्यवसाय वाढले आहेत. इंजिनीयर्स, ड्रायव्हर्स आदींसह अनेकांना मोठया प्रमाणात रोजगार मिळत आहेत. याबाबतची आकडेवारी जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच काश्‍मीरमध्ये एक बोगदा निर्माण केला असून त्यासाठी 2000 काश्‍मिरी युवकांना रोजगार मिळाला. जोजिला बोगद्याच्या कामासाठी 4,000 काश्‍मिरी युवकांना रोजगार मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button