breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

चंद्रपूर जिल्ह्य़ातील बिबट्याच्या मृत्यू प्रकरणी १९ आरोपींना अटक

चंद्रपुरमधील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या व्याहाड खुर्द उपवनातील बीट शिर्शी नियतक्षेत्र 1534 साखरी माल येथे, काल रानडुक्कराची शिकार करण्यासाठी  लावलेल्या जाळीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही माहिती वनपरिक्षेत्राला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे  हे विभागीय अधिकारी सोनकुसरे यांना  याबाबत कळवून घटनास्थळी वन कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन दाखल झाले होते. बिबट्याचा मृत्यू झाला असल्याने आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवून, नेमकं जाळे कशासाठी लावण्यात आले याची चौकशी करून 19 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

या आरोपींमध्ये भोजराज ठाकुर, सुखदेव बांबोळे, आकाश कुमरे, नरेंद्र भोयर, सावजी उराडे, श्रीधर गेडाम, दवरथ गेडाम, विवेक आवळे, ठाकुर, रमेश भोयर, राजू भोयर, प्रमोद भोयर,देवराव बांबोळे ,सत्यवान गेडाम सर्व रा.शिर्शी तर तुळशीराम भोयर, भाऊजी भोयर, किशोर भोयर, पुरुषोत्तम सोयाम आदी रा.पेठगाव यांच्या समावेश आहे. या सर्वांवर वन्यजीव अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button