breaking-newsपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

वाढीव खर्चाची ‘घंटा’ : माडगुळकर नाट्यगृहाचा खर्च ३७ कोटीवरून ७० कोटींवर!

अद्यापही काम अर्धवट अवस्थेत,प्रशासक राजवटीतही खर्च वाढला

पिंपरी । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी।

 नागरिकांची सांस्कृतिक भुक भागविण्यासाठी सन २०१३ मध्ये ८०० प्रेक्षकक्षमता असलेले आकुर्डी – प्राधिकरणात ज्येष्ठ साहित्यिक ग. दी. माडगुळकर नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांची पैशाची भुक भागत नसल्याने आठ वर्षात या नाट्यगृहाचे काम ३७ कोटीवरून ७० कोटींवर पोहोचले. आता या नाट्यगृहातील कलाकारांच्या मेकअप रूमसाठी फर्निचर व इतर किरकोळ स्वरूपाच्या कामांसाठी १० लाखांचा खर्च केला जाणार आहे. सध्या कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, कॅपेटएरिया, निवासी खोल्यांचे आणि बाह्य सजावटीचे काम अर्धवट अवस्थेत आहे.


पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने आकुर्डी – प्राधिकरणात ज्येष्ठ साहित्यिक ग. दी. माडगुळकर यांच्या नावाने ८०० प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असलेले उत्तम प्रतीचे नाट्यगृह उभारण्यात येत आहे. पेठ क्रमांक २६ मधील ५ हजार चौरस मीटर भुखंडावर हे नाट्यगृह उभे केले जात आहे. या नाट्यगृहामध्ये २२० प्रेक्षक क्षमता असलेले एक लहान सभागृह, ११० बैठक व्यवस्था असलेले कॉन्फरन्स हॉल आणि कलादालन तसेच १२ निवासी खोल्या बांधण्याचे नियोजन आहे. नाट्यगृहात आधुनिक पद्धतीने विद्युत व्यवस्था करणे, ध्वनी व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. नागरिकांसाठी अ‍ॅम्पिथियटर, रेस्टॉरंटची सोयही करण्यात येणार आहे. या नाट्यगृहाच्या कामाला सन २०१३ मध्ये मंजुरी मिळाली. त्यावेळी ३७ कोटीचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यांनतर हा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे.
नाट्यगृहाचे काम संथगतीने…

नाट्यगृहाचे काम सुरूवातीपासून संथगतीने सुरू आहे. सध्या या नाट्यगृहातील काम अंतिम टप्प्यात आहे. नाट्यगृहातील कलाकारांच्या मेकअप रूमसाठी आवश्यक असणारे फर्निचर व इतर किरकोळ स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे १० लाख रूपये निधीची आवश्यकता आहे. या नाट्यगृहाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याने ही फर्निचरची कामे तातडीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे आकुर्डी नाट्यगृहातील कलाकारांच्या खोलीतील मेकअप रूमसाठी आवश्यक असणारे फर्निचर व इतर किरकोळ स्वरूपाची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी १० लाखाचा खर्च केला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button