breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरगुती कारणातून दिघीत लहान भावाला मारहाण

पिंपरी । प्रतिनिधी

घरगुती कारणांवरून झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाला मारहाण करत त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री साई सिद्ध कॉलनी, साई पार्क , दिघी येथे घडली असून याबाबत २७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहाजी बाबुराव घुले ( रा. साई सिद्ध कॉलनी, साई पार्क, दिघी) असे जखमी लहान भावाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी बाबुराव घुले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शहाजी यांनी मोठा भाऊ शिवाजी यांच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी सहा हजार रुपये दिले होते. त्यानंतर घर खर्चासाठी हातउसने नऊ हजार रुपये दिले होते. शिवाजी यांनी त्यातील तीन हजार रुपये शहाजी यांना परत दिले. उरलेले पैसे शहाजी यांनी मागितले असता शिवाजीने शहाजी यांना आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये शहाजी यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button