breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोविड रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी आयुक्तांकडून कार्यकारी समितीची स्थापना

पिंपरी । प्रतिनिधी

राज्य शासन व पीएमआरडीएच्या वतीने नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडिमय मैदान आणि महापालिकेच्या वतीने चिंचवडच्या ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉल येथे उभारण्यात आलेल्या कोरोना तात्पुरत्या रुग्णालयासाठी ( डीसीएच ) पालिकेने कार्यकारी समिती गुरुवारी (दि. २७) स्थापन केली आहे. ही समिती रुग्णालयांचे व्यवस्थापन पाहणार आहे.

पीएमआरडीएतर्फे पुण्यात ११ ऑगस्टला झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत वरील दोन रुग्णालयासाठी कार्यकारी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी समिती स्थापन केली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील हे समितीचे अध्यक्ष आहेत. तर, अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, रुग्णालय उभारणाऱ्या ठेकेदारांचे प्रतिनिधी आणि मेडिकल ऑपरेटर पुरविणाऱ्या ठेकेदारांचे प्रतिनिधी हे समितीवर सदस्य आहेत. तर, अतिरिक्त आरोग्य वैयकीय अधिकारी डॉ. पवन साळवे हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

रुग्णालय सुरू झाल्यानंतर कामकाजाचे संचालन करणे, पालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या पाणी, विद्युत, ड्रेनेज, घनकचरा, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थानावर नियंत्रण ठेवणे, फैसिलिटी एजन्सी व मेडिकल ऑपरेटर पुरवठादाराच्या कामावर देखरेख ठेवणे, रुग्णांवर शासनाच्या मार्गदर्शकतत्वानुसार उपचार होत असल्याची खातरजमा करणे, टप्प्याटप्प्याने पुरवठादाराला बिले अदा करणे आदी कामे समितीवर सोपविण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button