breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरकूल प्रकल्पातील सदनिका वाटपाची प्रक्रिया तत्काळ राबविणार; मनपा प्रशासनाचे आश्वासन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखली येथील घरकुल प्रकल्पातील सदनिका बांधून तयार असूनही, लाभार्थ्यांना वाटप करण्यास दिरंगाई होत असल्याबाबत रिपब्लिकन पार्टीचे अजिज शेख यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला होता. त्यावर आज रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिका-यांनी पालिकेच्या समोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यावर सदनिका वाटपास तात्काळ सुरूवात केली जाईल, असे लेखी आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चिखली येथे घरकुल योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना हक्काची घरे देण्याचा उद्देश आहे. २००८ पासून सुरू असलेली ही योजना अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाही. दहा वर्षांत काही लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आलेले आहे. परंतु, अनेक लाभार्थी अजूनही हक्काचे घर कधी मिळणार याकडे गेल्या दहा वर्षांपासून टक लावून पाहत आहेत.

अजिज शेख यांनी लाभार्थ्यांना सदनिकांचे त्वरित वाटप सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले होते. त्यानुसार अजिज शेख व रिपब्लिक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर मंगळवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता आंदोलन केले. सहशहर अभियंता राजन पाटील यांनी आंदोलकांना दुपारी साडेतीन वाजता चर्चेसाठी बोलावले. आयुक्त हर्डीकर यांच्या कक्षात ही चर्चा झाली. यावेळी नगरसेविका आशा शेंडगे, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

सदनिका वाटपाचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांनी प्रकल्पाच्या ९ इमारतीतील ३७८ सदनिका तयार असून त्या लाभार्थ्यांना हस्तांतर करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले. राजन पाटील कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांच्यामार्फत आंदोलकांना घलकुल प्रकल्पाच्या कामाला ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे लेखी उत्तर देऊन पळवाट शोधली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button