breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आवडलेले विषय घेऊन शाखा निवडल्यास यश हमखास; विवेक वेलणकर यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

पिंपरी – तुमच्या मित्रांनी जी शाखा निवडली, त्याचे अनुकरण करू नका. प्रत्येक क्षेत्रात संधी आहे. तुम्हाला नावडलेल्या विषयांचा विचार न करता आवडलेले विषय घेऊन शाखा निवड केली तर हमखास यशस्वी व्हाल, असा काणमंत्र विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

चिंचवड येथील दर्शन हॉलमध्ये करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता दहावीनंतरची शाखा निवड या विषयी वेलणकर बोलत होते. उद्योजक व्हा, या विषयांवर उद्योजक व लेखक प्रा. नामदेव जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ४९५ विद्यार्थ्यांना भेट वस्तू व शाखा निवडबाबत पुस्तक भेट स्वरुपात देण्यात आले. व्यासपीठावर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीराम परबत गुरुजी, ह.भ.प. किसन महाराज चौधरी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले, माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे, प्रभाग सदस्य विठ्ठल भोईर, हेमंत हरहरे, रविंद्र देशपांडे. समवेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

वेलणकर म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्यांनी अमुकच शाखा निवडीचा हट्टाहास करू नये. पाल्याची आवड कशात आहे, याचा सारासार विचार पुढील शिक्षणाची शाखा निवडताना करावा. रोजगार व स्वयंरोजगारासाठी विद्यार्थ्यांनी चिकाटी, ध्येय, कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. यावेळी अभियंता, कला, वाणिज्य, विज्ञान इतर करिअर कोर्सेसबाबत सखोल मार्गदर्शन वेलणकर यांनी केले.

नोकरी पेक्षा उद्योजक व्हा, या विषयावर बोलताना प्रा. जाधव म्हणाले की, हल्ली मी माझी आई, वडील, पत्नी, घर व नोकरी याबाबत समाजाची मानसीकता झालेली दिसून येते. नोकरी करण्यापेक्षा मी उद्योजक होऊन इतरांना नोकरी देईल, हा संकल्प विद्यार्थी व पालकांनी करावा. विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्याच्या ध्येयाच्या मागे लागले तर प्रतिष्ठा व पैसा अपोआप त्याच्या मागे येतो. याची खुणगाठ बांधा. यावेळी माजी सभापती नाना शिवले यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगरसेवक सुरेश भोईर यांनी केली. सुत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले. तर, आभार अंबर चिंचवडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयकुमार मंजुगडे, पोपटराव पवार, विजयकुमार बोरसे, देवीदास धनवडे, नंदू टकले, प्रज्ञेश भोईर, पांडुरंग भोईर, प्रमोद भोईर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button