breaking-newsपुणे

ग्रामीण संस्कृतींना उजाळा देणाऱ्या भीमथडी जत्रेचे 14 व्या वर्षात उत्साहात प्रदार्पण

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी

ॲग्रीकल्चरल डेव्ललपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भीमथडी’ जत्रेने आज उत्साहात  14व्या वर्षात प्रदार्पण केले आहे. ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ. प. केशव महाराज नामदास, ह. भ. प. मधुकर महाराज मोरे, ह. भ. प. योगेश महाराज पालखीवालेह.भ. प. कृष्णराव चोपदार, राजभाऊ चोपदार, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे  राजेंद्र पवार, भीमथडी जत्रा आयोजिका सुनंदा ताई पवार, रमेश आप्पा थोरात यांच्या उपस्थितीत या जत्रेचे उद्घाटन करण्यात आले.

 महाराष्ट्राची संस्कृती म्हणून जगभर पंढरपूरची वारी प्रसिद्ध आहे आणि या संस्कृतीचे संवर्धन म्हणून भीमथडी जत्रेमध्ये वारीच्या संकल्पनेचा विचार करण्यात आला आहे. निष्ठा, सेवा, श्रद्धा, कला, संस्कृती आणि अध्यात्म याचे दर्शन व्हावे या उद्देशाने पंढरीच्या वारीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे यावेळी आयोजन करण्यात आले आहे.नेहमीप्रमाणेच यंदाही आगळी-वेगळी भीमथडी जत्रा करण्याचा संस्थेने प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील ग्रामीण कलाकारांना त्यांची कला दाखवता यावी या हेतूने त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील बारा बलुतेदार यांना व्यासपीठ दिले आहे. शंभर वर्षांपूर्वी खेडे कसे होते याचे जीवंत चित्रण मागील आठ भीमथडी जत्रेमध्ये दाखविण्यात आले. या वर्षी पिंगळा, वासुदेव, ज्योतिषी, नंदीबैल, कुंभार, बुरुड, जागरण, गोंधळी, पोतराज, मरिआईचे भक्त, आदिवासी कला, तारफा, सनई-चौघडा अशा अनेक कलाकारांचा या जत्रेत सहभाग आहे.

तसेच ग्रामीण भागातील खाद्य परंपरा शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही रुपात चाखण्यास मिळणार आहे. घुट-हुलग्याचे माडगे, मांडे, धपाटे, मोदक, पुरणपोळी, पिठलं-भाकरी, चुलीवरचं मटण, गावरान कोंबडी अशा अस्सल गावराण जेवणाचा तडका पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. तर गुरुवारी (ता. १९) रात्री राजस्थानी कला संस्कृतीचे दर्शन हे खास आकर्षण असणार आहे. शुक्रवारी (ता. २०) हिंदुस्थानी/सूफी संगीताने भीमथडी जत्रा मंत्रमुग्ध होणार असून शनिवारी (ता. २१) तुम्हाला ढोल-ताशाच्या तालात मराठी गाण्याचा आधुनिक संगम बघायला मिळणार आहे.  इतकेच नव्हे तर,  (ता. 19)  उद्या या जत्रेत खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button