breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

या दिवशी प्रदर्शित होणार Money Heist 5

नेटफ्लिक्सची ‘मनी हाईस्ट’ ही वेब सीरिज सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या या सीरिजने आपल्या अनोख्या पटकथेच्या जोरावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वत:कडे गमावण्यासारखं काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो.

या लक्षवेधी चोरीने तब्बल चार सिझन प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. आता या सीरिजचा पाचवा आणि अंतीम भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मनी हाईस्टमध्ये ‘प्रोफेसर’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अल्वारो मोर्ते याने एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या पाचव्या सीझनची घोषणा केली. या सीरिजचं पाचवं पर्व येत्या ५ मे २०२१ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मी परत आलोय. प्रोफेसर परत आलाय’, असं कॅप्शन देत अल्वारोने एक फोटो पोस्ट केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button