breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! प्रेमप्रकरणामुळे दलित तरुणाला करायला लावलं किळसवाणं कृत्य

नवी दिल्ली |

एका दलित व्यक्तीला जमिनीवरील थुंकी चाटायला लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्याला जबरदस्तीने मूत्रही पाजण्यात आलं. बिहारमधील गया येथे हा घृणास्पद प्रकार घडला आहे. प्रेमप्रकरणामुळे दलित व्यक्तीला पंचायतकडून ही शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंचायतदरम्यान अनेक जण थुंकत असून दलित व्यक्तीला ते चाटण्यास लावलं जात आहे.

थुंकी चाटल्यानंतर दलित व्यक्तीला जबरदस्ती मूत्र पाजण्यात आलं. गया येथील वझीरगंज परिसरात हा प्रकार घडला आहे. दलित व्यक्तीचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर पंचायतीकडून ही शिक्षा सुनावण्यात आली होती. पीडित व्यक्ती महिलेसोबत पळून गेला होता. नंतर महिलेच्या कुटुंबीयांना त्यांना पकडून पंचायतसमोर हजर केलं होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गया पोलिसांनी घटनेची दखल घेतली. गयाचे एसएसपी आदित्य कुमार यांनी याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

वाचा- कुंभमेळ्याची निजामुद्दीन मरकजशी तुलना अयोग्य: उत्तराखंडचे मुख्यमंत्री

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button