breaking-newsताज्या घडामोडी

रायगडच्या घोणसे घाटात भीषण अपघात, प्रवासी बस दरीत कोसळली, तिघांचा मृत्यू, २० जखमी

रायगड |

खासगी प्रवासी बसला अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीये. रायगडच्या घोणसे घाटात हा भीषण अपघात घडला. या घटनेत २० जण जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन अशा प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. ही बस ८ मे २०२२ रोजी आठच्या सुमारास ६० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले असल्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितले आहे.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली आहे. सर्व यंत्रणा तात्काळ मदातकार्याला लागली आहे. तर, पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली असून अपघातग्रस्तांना आवश्यक उपचार देण्याविषयी आरोग्य यंत्रणेला निर्देश दिले आहेत.

नालासोपारा येथून एक खाजगी बस निघाली होती. तिचा घोणसे घाटात अपघात झाला आहे. रायगडच्या घोणसे घाटात या बसला भीषण अपघात झाला आहे. ही बस पुलावरुन ६० फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ठाणे येथून श्रीवर्धन येथील म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाणे येथे राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा येथे येत असताना हा अपघात झाला. सध्या युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. दरम्यान मृतांची ओळख पटविण्याबाबतची कार्यवाही आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button