breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, ६८ वर्षीय मुख्याध्यापकाला ठोकल्या बेड्या

महाईन्यूज | पुणे

पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात मुख्याध्यापकाने १५ वर्षीय विद्यार्थावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ६८ वर्षीय मुख्याध्यापक मोहम्मद अली याला कामशेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. ही गंभीर घटना एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली असून तिथे वसतिगृह देखील आहे.दरम्यान, याच वसतिगृहात दहा दिवसांपूर्वी केअरटेकर रसूल याने १४ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याच घटनेचा तपास करत असताना कामशेत पोलिसांना दुसऱ्या एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत परिसरात असणाऱ्या वसतिगृहात ज्यांना आई वडील नाहीत असे मुले शिक्षण घेतात, तसेच तिथे राहण्याची देखील सोय आहे. दरम्यान, केअरटेकर रसूल याने एका १४ वर्षीय वसतिगृहातील मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलाला नातेवाईक घरी घेऊन गेले होते. तेव्हा, ही गंभीर घटना नातेवाईकांना मुलाने सांगितली होती. तात्काळ नातेवाईकांनी कामशेत पोलिसात तक्रार दिली आणि केअरटेकर रसूल ला जेरबंद केले. परंतु, कामशेत पोलिसांची वसतिगृहातील मुलांकडे चौकशी सुरू होती तेव्हा अन्य एका १५ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button