breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘चंदन तस्करी’ची जबाबदारी कोण घेणार ?, विरोधकांचा प्रशासनाला ‘सवाल’

  • महापालिका स्थायी समिती सभेत गदारोळ
  • प्रशासनावर विरोधकांनी व्यक्त केला संताप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

काळभोरनगर येथील महापालिकेच्या उद्यानातील अकरा चंदनाच्या झाडांची तस्करी झाल्याने आज बुधवारी (दि. 11) स्थायी समिती सभेत विरोधकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. चंदन तस्करी होताना पालिकेचे सुरक्षारक्षक काय करत होते, असा सवाल करत विरोधकांनी प्रशासनाकडे याबाबत खुलासा मागितला. त्यावर माहिती घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर येथील शंकर शेट्टी उद्यानातून आठ ते दहा वर्षांची असणारी 11 चंदनाची झाडे सोमवारी रात्री चोरीला गेली. याबाबत पालिका उद्यान विभागाकडून याचा पंचनामा करुन मोहननगर पोलिस चाैकीत तक्रार केली. याचे पडसाद आजच्या स्थायी समिती सभेत उमटले. याबाबत केवळ तक्रार दाखल होऊन उपयोग नाही. ही चोरी होताना पालिकेचे सुरक्षारक्षक काय झोपी गेले होते काय, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी सभागृहात प्रशासनाला घेरले. त्यावर आयुक्त हर्डीकर यांनी तातडीने उद्यान विभागाचे सहायक आयुक्त सुरेश साळुंखे यांच्याकडे याचा खुलासा मागितला.

त्यावर प्रशासनाने टोलवाटोलवीची उत्तरे दिली. साळुंखे यांनी यासंदर्भात संबंधितांकडून सविस्तर माहिती घेऊन कळविण्याचे आश्वासन दिले. आयुक्त हर्डीकर यांनी यासंदर्भात सखोल माहिती घेऊन दोषी आढळणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले, अशी माहिती कलाटे यांनी दिली.

पालिकेच्या उद्यानातून रात्री चंदनाच्या झाडांची चोरी झाली. दरम्यान, उद्यानात रात्रपाळीचे सुरक्षारक्षक नव्हते, असे प्रशासनाने सांगितले. मात्र, या चोरीची सर्वस्वी जबाबदारी कोण घेणार ?. केवळ पोलिसांत तक्रार दाखल होऊन उपयोग नाही. संबंधित विभागातील प्रमुख अधिका-यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दोषी कोण आहे, हे समोर आले पाहिजे

राहूल कलाटे, गटनेते, शिवसेना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button