breaking-newsपिंपरी / चिंचवड

ताथवडेत अनधिकृत बांधकामांवर कारवाईची बोळवण

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 25 मधील ताथवडे येथील अनधिकृत बांधकामांवर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने कारवाई केली. कारवाईत 23 बांधकामे निष्काशीत करण्यात आली आहेत.

शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव वाढले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळात सर्रास बांधकामे वेगाने बांधली जात आहेत. राजकीय दबावाला बळी पडून महापालिकेच्या संबंधीत विभागातील अधिकारी कारवाई करण्यास धजावत नसल्याचे वास्तव आहे. पत्राशेड, अर्धवट बांधलेली भिंत, ओटा अशी किरकोळ बांधकामे पाडून कार्यक्षम असल्याचे पालिका प्रशासन दाखवू लागले आहे. प्रत्यक्षात मोठ्या बांधकामांवर कारवाई जाणूनबुजून केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग 25 ताथवडे येथील तब्बल 23 अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 18 आरसीसी बांधकामे, 3 पत्राशेड, 2 विट बांधकाम अशा एकूण 23 बांधकामांवर कारवाई केली आहे. या कारवाईसाठी ३ मनपा पोलीस, २२ वाकड पोलीस, १ ब्रेकर, २ जेसीबी, १ रुग्णवाहिका, १५ मजूर व मनपाचे तांत्रिक कर्मचारी कार्यरत होते, अशी माहिती पालिका प्रशासनाने कळविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button