breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सॅटेलाईट इमेजमध्ये चिनी सैन्याच्या हालचाली उघड

नवी दिल्ली | चीनने पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव हा कराराचा भंग असल्याचा आरोप भारताने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताने हा चीनच्या सीमेवरील सैन्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या जमवाजमवीला हरकत घेतली आहे. मागच्याच आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा झाल्या. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, असं वाटत असतानाच चीनने पुन्हा सीमेपलीकडे सैन्याची आणि युद्धसाहित्याची आवक वाढवली आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार त्यांनी मिळवलेल्या उपग्रहाने काढलेल्या या परिसराच्या फोटोनुसार, चीनने या परिसरात एक तळ उभारला आहे. चीनी सैन्याचा हा तळ गलवान खोऱ्यात जिथे भारत आणि चीन यांच्यात चकमक झाली त्याच ठिकाणी असल्याचं स्पष्ट दिसतं. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रात काही तंबू दिसतात, त्याखाली काही बांधकाम सुरु असावं असा संशय रॉयटरच्या बातमीत व्यक्त करण्यात आला आहे. कारण या सॅटेलाईटद्वारे काढलेल्या या चित्रात बांधकामाच्या ठिकाणी असतात तशा भिंती आणि बॅरिकेट्स असल्याचंही दिसत असल्याचं बातमीत म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button