breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाट्य परिषदेचा “आशा भोसले पुरस्कार” उदित नारायण यांना जाहीर; अजित पवारांच्या हस्ते होणार वितरण

पिंपरी – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा संगीतकार आणि गायकास प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा आशा भोसले पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक पद्म भूषण उदित नारायण यांना जाहिर झाला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी पत्रकार परिषदेत आज शनिवारी (दि. 28) दिली.

 

नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे  २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावे आशा भोसले पुरस्कार दिला जातो. देश पातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या संगीतकार आणि गायकास आशाजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार दिला जातो.

 

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, ‘‘पुरस्काराचे यंदाचे सोळावे वर्ष असून हा पुरस्कार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायसक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन व सोनू निगम, सुनिधी चौव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोळावा पुरस्कार सुप्रसिध्द गायक पद्म भूषण उदीत नारायण यांना जाहीर करताना परिषदेला आनंद होत आहे. १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  उदीत नारायण यांनी ३२ भाषांत अठरा हजार गाणी गायली असून लता मंगेशकर यांच्याबरोबर २०० गाणी तर आशा भोसलेंबरोबर चारशेहून अधिक गाणी गायली आहेत.

 

यंदाचा हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाच वाजता पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे होणार आहे.  यावेळी पुरस्काराचे वितरण माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. जेष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेता दत्ता साने आदी उपस्थित राहणार आहे.

 

यावेळी उदीत नारायण  यांच्या  गीतांवर आधारित मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत  ‘रजनीगंधा’ तसेच वैशाली पळसुले सादर ‘फ्युजन नृत्य’ हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामुल्य सादर होईल. तरी कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन भोईर यांनी केले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button