breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गुजरातमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना

भावनगर | गुजरातमधील सिहोर जिल्ह्यात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात कलम २९५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काल सोमवारी मध्यरात्री काही अज्ञात समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा चेहरा झाकला. त्याचबरोबर या परिसरात पुतळ्याशेजारी रिकाम्या दारूच्या बाटल्या ठेवल्या. हे संतापजनक कृत्य काही स्थानिक नागरिकांनी आज सकाळी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ सिहोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सोमवारी मध्यरात्री ते आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे परिसरात असंतोष निर्माण झाला असून या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button