breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

गुजरातमधून नवी मुंबईत गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी, पोलिसांकडून 50 लाखांचा साठा जप्त

नवी मुंबई | गुटखा बंदी असतानाही राज्यात छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलीस आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्यात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. सरकारकडून गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश असतानाही राज्यात गुटखा विकला जात असल्याचं समोर आलं आहे.

नवी मुंबई अंमली विरोधी पथकाने म्हापे एमआयडीसी इथल्या ओयो सिल्व्हर हॅाटेलसमोरील मोकळ्या जाग्यावर गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला. तब्बल 50 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक केली आहे. गुजरात इथून नवी मुंबईमध्ये गुटखा विकायला आला असून यावेळी गुटख्याची 94 हून अधिक बोचकी आयशर टेम्पोमधून इतर गाड्यांमध्ये पलटी करण्यात अल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मिळाली.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधबंते यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हापे एमआयडीसी परिसरात ओयो सिल्व्हर हॅाटेलसमोरील मोकळ्या जागेवर तैनात करण्यात आली. या दरम्यान, आयशर ट्रक क्रं. MH 14 FT 410 या वाहनांतील विमल गुटखा बोलेरो पिकअप क्रं. MH 43 BB 1856 आणि इको क्रं. MH 43 AR 7601 या वाहनात ठेवण्यात येत होता. यावेळी पोलिसांनी कारवाई करत जितेंद्र जितु कार्तीकचंद्र दास, प्रियव्रत अभयकुमार दास, मुन्ना श्रीजनार्दन यादव वय, अखेय बुद्धदेव खोंडा, रामदास पाटील यांना ताब्यात घेतलं.

संबंधित ट्रकमधून जवळपास 50 लाखांचा गुटखा टेम्पोसह हस्तगत केला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन दिली असून त्यांचेसुद्धा पथक घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी गुटखा माफिया जितेंद्र कार्तीकचंद्र दास आणि त्याच्या 3 साथीदाराला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये अजून कोणाचा समावेश आहे, गुटखा कोणाला विकला जाणार होता ? याचा पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button