breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक अॅप्स, फोनमधून तात्काळ डिलीट करा

नवी दिल्ली – मॅलिशस अॅप्ससंबंधी लागोपाठ माहिती समोर येत आहे. आता Avast च्या सायबरसिक्यॉरिटी रिसर्चर टीम ने ७ मॅलिशस एेडवेयर स्कॅम्स अॅप्सची माहिती उघड केली आहे. या अॅप्सला गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून अँड्रॉयड व आयफोन युजर्सकडून २४ लाख वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे. या अॅप्सच्या डेव्हलपर्सने आतापर्यंत ५०००००० डॉलरची कमाई केलेली आहे. या अॅप्सला प्रसिद्ध टिकटॉक आणि इन्स्टाग्राम सारख्या प्रोफाइल्सने डाउनलोड करण्यात आले आहे.

अवास्टवर एका ब्लॉग पोस्टच्या माहितीनुसार, टीमने ३ अशा प्रोफाईलची माहिती लावली आहे. जे टिकटॉकवर मॅलिशस अॅप्सला वेगाने डाउनलोड करण्यासाठी पूश करीत होते. टिकटॉकवर असे असे प्रोफाईल वर ३ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. रिसर्चर्सने इंस्टाग्रामवर एक अशी प्रोफाइलची माहिती उघड केली आहे. यात एकावर ५००० हून जास्त फॉलोअर्स आहेत. अवास्टने अशा ७ अॅप्सची माहिती अॅपल गुगलला दिली आहे.

ZDNet च्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की, ThemeZone, Shawky App Free, Shock My Friends, Ultimate Music Downloader, Free Download Music ला गूगल प्ले स्टोर वरून हटवले आहे. या दरम्यान, Shock My Friends – Satuna, 666 Time, ThemeZone, Live Wallpapers आणि shock my friend tap roulette v अॅप्स ला अॅपल अॅप स्टोर वरून रिमूव्ह केले आहे.

अवास्टच्या टीमने या अॅप्सला गेम्स, वॉलपेपर आणि म्यूझिक डाउनलोड अॅप्स म्हणून डेव्हलेप केले आहे. तसेच तरुणांना लक्ष्य केले आहे. वारंवार अॅप शो करीत होते. यामुळे युजर्संना अतिरिक्त सर्विससाठी २ ते १० डॉलरपर्यंत चार्ज द्यावा लागत होता. यात काही जाहिराती सुद्धा दाखवल्या जात होत्या. यातून ते पैसे कमावत होते.

अवास्टच्या थ्रेट अनालिस्ट जॅकब वावरा यांनी सांगितले की, ज्या अॅप्सला आम्ही शोधून काढले आहे. ते गुगल आणि अॅपल अॅप पॉलिसीजचे उल्लंघन करीत होते. गुगल आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले आहे. तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा, असे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button