breaking-newsराष्ट्रिय

नेहरुंमुळेच भारताला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभला : शशी थरुर

आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा असेच काहीसे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या धोरणांमुळे देशाला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभल्याचे त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. नेहरुंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

View image on Twitter

ANI

@ANI

If today we have a ‘chaiwala’ as Prime Minister, it’s because Nehru ji made it possible to create the institutional structures through which any Indian can aspire to rise to the highest office in the land: Shashi Tharoor, Congress in Delhi (13.11.2018)

१,१६४ लोक याविषयी बोलत आहेत

थरुर म्हणाले, आज आपल्याला एक चहावाला पंतप्रधान म्हणून लाभू शकतो, ते केवळ नेहरुंजीमुळे शक्य झाले आहे. नेहरुंनी निर्माण केलेल्या संस्थात्मक धोरणांमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च पदावर पोहोचण्याची इच्छाशक्ती निर्माण होते. त्यामुळे नेहरु भारतमातेचे एक महान पुत्र असताना त्यांच्यावर इंटरनेटवरुन चिखलफेक करणारे लिखान केले जाते. त्यांच्या संस्थात्मक रचनांच्या उभारणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही त्यांनी केला आहे.

ANI

@ANI

We’ve seen a consorted campaign of vilification, of calumny, astonishing amount of lies that are out there on internet…Why is there this desire to undermine such a great son of India (JL Nehru), somebody who laid the foundations for what we have created?: Shashi Tharoor (13.11)

View image on Twitter

ANI

@ANI

If today the govt can boast about Managlyaan, ask who created ISRO. Who decided that even poor India could dare to aim for the skies? Who created the IITs that sent so many bright young men to Silicon Valley that 40% of the start-ups there are helmed by Indians?: S Tharoor(13.11) pic.twitter.com/Iicetto6Bt

View image on Twitter

५४ लोक याविषयी बोलत आहेत

भारत सध्या मंगलयानाच्या माध्यमातून मंगळावर पोहोचण्यााचे स्वप्न इस्रोच्या माध्यमातून पाहत आहे. मात्र, या अवकाश संसोधन संस्थेची अर्थात इस्रोची स्थापना नेहरूंनीच केली. गरीब भारतीयांना अयवकाशातील मोठी स्वप्ने पहायची त्यांनी ठरवले. नेहरुंनी आयआयटी सारख्या दर्जेदार संस्थांची निर्मिती केली. या माध्यमातून दरवर्षी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये ४० टक्के भारतीय तरुण काम करीत आहेत.

दरम्यान, नेहरुंच्या जीवनावरील ‘नेहरु : द इन्व्हेन्शन’ या थरुर यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील नेहरुंची महती कथन केली होती. संयुक्त लोकशाही आणि भारतीय राजकारणातील राजयकीय महत्व ही नेहरुंचीच देणगी आहे.

यावेळी नेहरुंच्या या धोरणांची माहिती थरुर यांनी दिली. भारतीय लोकशाहीचे जे मजबूत चार स्तंभ आहेत. यामध्ये संविधानात्मक संस्था, धर्मनिरपेक्षता, सामाजिक अर्थतज्ज्ञ. मात्र, दुर्देवानं आज यालाच आव्हान दिले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button