breaking-newsमनोरंजन

ऐश्वर्याचा बटरफ्लाय गाऊन तयार करण्यास लागले ‘इतके’ तास

‘कान्स’च्या रेड कार्पेटवर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा पाहायला मिळाला. ऐश्वर्याच्या एकाहून एक लूकने चाहत्यांची मनं जिंकली. तिच्या काळ्या आणि निळ्या रंगाच्या बटरफ्लाय गाऊनची चर्चा सर्वाधिक पाहायला मिळाली. ही चर्चा होणं स्वाभाविकच आहे, कारण फॅशन डिझायनर मायकल सिंको यांनी डिझाइन केलेल्या या अप्रतिम गाऊनमागे ३ हजार तासांची कठोर मेहनत आहे.

एका वेबसाईटशी साधलेल्या संवादात सिंको यांनी याविषयी माहिती दिली. ‘ या गाऊनवरील संपूर्ण डिझानइन फ्रेंच पॅलेट्स आणि स्वारोवस्की क्रिस्टलने करण्यात आली आहे. त्यासाठी खास अल्ट्रा वायोलेट, मिडनाइट ब्लू आणि लाल रंगाच्या धाग्यांचा वापर करण्यात आला आहे. गाऊनला मागे २० फूट लांब ट्रेल देण्यात आला आहे ज्यावर संपूर्ण फुलपाखरांची डिझाइन करण्यात आली आहे,’ असे ते म्हणाले. हा गाऊन डिझाइन करण्यासाठी तब्बल ३ हजार तास लागले. म्हणजेच जवळपास चार महिन्यांहून अधिकचा काळ लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button