breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अंतर्गत दहशतवादाचा बिमोड करण्यास ‘बिमस्टेक’ सक्षम – लष्करप्रमुख

संयुक्त युद्धसरावाचा समारोप

‘बिमस्टेक’ गटातील सर्व देश हे अंतर्गत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सक्षम असून त्यांच्यातील समन्वय मजबूत करण्यासाठी मिलेक्स २०१८ या संयुक्त युद्धसरावाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भविष्यातील संकटांना तोंड देण्यासाठी माहिती, कौशल्य आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा हेतू या युद्धसरावातून सफल झाला, असे मत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी रविवारी व्यक्त केले.

भारत सरकारच्या पुढाकाराने ‘बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन’ (बिमस्टेक) गटातील देशांच्या ‘मिलेक्स २०१८’ या संयुक्त युद्धसरावाचा रविवारी समारोप झाला. देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ‘बिमस्टेक’चे सरचिटणीस शाहीदुल इस्लाम यावेळी उपस्थित होते.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले की,  संयुक्त युद्धसरावाचा उद्देश हा चीन किंवा इतर कोणत्याही राष्ट्राविरुद्ध आघाडी उभी करणे हा नाही. बिमस्टेक राष्ट्रांमध्ये परस्पर सहकार्य आणि संवाद प्रस्थापित करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. गरिबीचे निर्मूलन, आर्थिक विकास हे मुद्दे या संघटनेच्या केंद्रस्थानी आहेत. संयुक्त युद्ध सरावातून दहशतवादाविरोधातील लढय़ामध्ये परस्परांचे सहकार्य मिळवण्याचा उद्देश आहे. जगातील सर्वच राष्ट्रे दहशतवादाचा सामना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वेकडे पाहा असा संदेश दिला असून बिमस्टेक देशांच्या समन्वयातून दहशतवादाविरुद्धचा लढा मजबूत करण्यासाठी भारत पुढाकार घेणार आहे.

बिमस्टेक संघटनेचे सरचिटणीस इस्लाम म्हणाले की, दहशतावादाविरुद्धच्या लढय़ातील निर्धार आणि त्याप्रती आत्मविश्वास या सरावादरम्यान दिसून आला असून देशांच्या अंतर्गत सुरक्षेसाठी या अनुभवाचा उपयोग होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button