breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खोदकाम करताना पुनावळेत सापडला ‘बाॅम्ब’

पिंपरी |महाईन्यूज|

गृहप्रकल्पाच्या बांधकाम साईटवर खोदकाम करताना शनिवारी (दि.19) ब्रिटीशकालीन बाॅम्ब सापडला आहे. पोलिसांनी बाॅम्ब ताब्यात घेतला असून, बाॅम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनावळे येथे गृहप्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. त्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम केले जात असताना ब्रिटिशकालीन बाॅम्ब आढळून आला. त्यावेळी जेसीबी चालक व कामगारांनी तेथील सुपरवायजरला माहिती दिली.

त्यानंतर पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळविण्यात आले. हिंजवडी पोलीस तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बाॅम्ब ताब्यात घेतला. तसेच याबाबत पुणे शहर पोलीस दलाच्या बाॅम्ब शोधक व नाशक पथकाला माहिती देण्यात आली आहे. या पथकाकडे बाॅम्ब देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button