breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

खोट्या बंदुकीचा धाक दाखवून लुटली बँक

पाटणा – खोट्या बंदुकीचा धाक दाखवून एका चोराने फक्त दोन मिनिटांत बँक लूटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटणामध्ये एका चोराने बँकेतून तब्बल 9.12 लाखांची रोख रक्कम लंपास केली आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वीणा चित्रपटगृहाजवळ यूनायटेड बँक ऑफ इंडिया आहे. या शाखेत दुपारी चोरीच्या घटना घडली आहे. चोराने खोट्या बंदुकीचा धाक दाखवून बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 9 लाख घेऊन तो पसार झाला.

मंगळवारी (31 डिसेंबर) ही घटना घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये चोर दोन्ही हातांनी पिशवीत कॅश भरताना दिसतो आहे. त्याच्याकडे कोणतच हत्यार नव्हतं. मात्र हत्यार असल्याचा दिखावा करत होता अशी माहिती गरिमा मलिक यांनी दिली आहे. सीसीटीव्ही फूटेजनुसार चोराने मंगळवारी दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी बँकेत प्रवेश केला. बँक लुटून तो 3 वाजून 6 मिनिटांनी पसार झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button