breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात एका कंपनीच्या कार्यालयाला आग

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील ताडीवाला राेड येथील एका पाेलारीस नामक कंपनीच्या ऑफीसला सकाळी आग लागली. या आगीत ऑफीसमधील सर्व सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत आग आटाेक्यात आणली. या आगीत ऑफीसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 8. 48 च्या सुमारास ताडीवाला राेड येथील चार मजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पाेलारीस कंपनीच्या कार्यालयाला आग लागली. आगीची माहिती मिळताच दयाराम राजगुरु अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तीन फायर इंजिनच्या सहाय्याने जवानांनी आग आटाेक्यात आणली. यात कुठलिही जीवीत हानी झाली नाही. परंतु ऑफीसचे माेठ्याप्रमाणावर नुकसान झाले. ऑफीसमधील फाईल्स, काॅम्प्युटर, फर्निचर आदी जळून खाक झाले. दरम्यान शाॅकसर्किटमुळे आग लागली असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button