breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवकांचे प्रश्न महासभेपुढे महापाैर स्विकारत नाहीत – तुषार कामठे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या महासभेपुढे सत्ताधारी नगरसेवकांनी विचारलेले प्रश्न महापाैर राहूल जाधव यांनी स्विकारले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातील एका प्रशिक्षण देणा-या संस्थाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ते प्रश्न महासभेकडे देवून त्यांची उत्तरे देण्याची मागणी केली होती. परंतू, महापाैर राहूल जाधव यांनी ते प्रश्न विचारले नसल्याचे खंत नगरसेवक तुषार कामठे यांनी व्यक्त केली. 

महापालिकेच्या महासभेत नगरसेवक विविध लेखी प्रश्न विचारतात. त्या प्रश्नाला  संबंधित प्रशासनाकडून लेखी उत्तर देण्यात येते. त्यावर महासभेत सांगोपांग चर्चा केली जाते. त्या प्रश्नावरील चर्चेतून तो प्रश्न मार्गी लागतो. त्यात सुधारणा केली जाते. तथापि, गेल्या काही दिवसांपासून महापौरांकडून प्रश्नच स्वीकारले जात नाहीत. विरोधकांचे तर नाहीच नाही. तर, सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांचे देखील प्रश्न त्यांच्याकडून स्वीकारले जात नाहीत.

भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागातील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशिक्षण संस्थाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. ऑल इंडिया इन्स्टिट्‌यूट ही संस्था महिलांसाठी प्रशिक्षण देण्याचे काम करते. या संस्थेने आतापर्यंत किती महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. महापालिकेचा अशा प्रकारच्या प्रशिक्षण घेण्यामागचा उद्देश काय ?, या संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन किती महिलांनी स्वयंरोजगार सुरु केला ? किती महिला उद्योजिका तयार झाल्या ? या संस्थेला काळ्या यादीत टाकल्यानंतरही पुन्हा कार्यान्वित करण्यामागचा हेतू व कारणे स्पष्ट करा.

दरम्यान, महापालिकेने आजपर्यंत अशा प्रकारच्या प्रशिक्षणावर किती खर्च केला. त्याचा तपशील देण्यात यावा, असे प्रश्न कामठे यांनी विचारले होते. हे प्रश्न डिसेंबर महिन्याच्या महासभेत घेण्याची विनंती त्यांनी महापौर जाधव यांच्याकडे केली होती. परंतु, महापौर राहुल जाधव यांनी ते प्रश्न स्वीकारले नाहीत. त्यामुळे भाजप नगरसेवकांनाच उत्तर मिळत नाहीत, अशी परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button