breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

खुशखबर! महाराष्ट्रातील पोलिसांसाठी असलेली कुटुंब आरोग्य योजना पुन्हा सुरू

मुंबई | महाईन्यूज

राज्यातील पोलिसांना लागू असलेली महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना शासनाने पुन्हा कार्यान्वित केलेली आहे. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे या योजनेचा पोलिसांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस महासंचालकांनी केले आहे.राज्यातील पोलिसांसाठी असलेल्या या योजनेअंतर्गत रुग्णालयातील देयके थकीत असल्यामुळे लाभ मिळत नव्हता. ही बाब नागपूर येथील महाराष्ट्र पोलीस परिवार व पोलीस मित्र न्याय हक्क संघर्ष समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख तसेच अतिरिक्त गृहसचिवांच्या निदर्शनास आणून दिलेले होते.

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनीही पाठपुरावा केला होता. अखेरीस ५० कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. तसेच महासंचालकांनाही अतिरिक्त १० कोटींचा निधी कुटुंब कल्याण निधीसाठी वापरण्यास अनुमती दिली आहे. महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना लागू असलेल्या दवाखान्यामध्ये पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याने भरती होते वेळी पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. रुग्णाला भरती केल्यानंतर दवाखान्यात चांगले उपचार मिळत नसतील तर रुग्णाला अन्यत्र हलविताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याचा शेरा आवश्यक आहे. अन्यथा या योजनेचा लाभ मिळत नाही, याकडेही या संघटनेने लक्ष वेधले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button