breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

खुशखबर! कोरोनावर औषध मिळालं, WHOने ब्रिटन सरकारचं केलं अभिनंदन!

जगभरात कोरोना विषाणूवर लस, औषध शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर डेक्सॅमेथासोन हे औषध प्रभावी असल्याचा दावा ब्रिटनच्या वैज्ञानिकांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेक्सॅमेथासोन औषधाच्या सुरुवातीच्या निकालांचे स्वागत केले आहे. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात डेक्सॅमेथासोन औषधाची चाचणी सुमारे २ हजार रुग्णांवर करण्यात आली. यावेळेस अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात हे औषध यशस्वी ठरले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ब्रिटन सरकारचे अभिनंदन केले आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, ‘कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरलेलं डेक्सॅमेथासोन हे पहिले औषध आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेक्सॅमेथासोन या औषधाला ब्रिटन सरकारने मान्यता दिली आहे. हे एक जुने आणि स्वस्त औषध आहे.’

प्रमुख संशोधक प्रो. मार्टिन लँड्रे म्हणाले की, ‘आता कोणताही उशीर न करता हॉस्पिटलमधील रुग्णांना हे औषध द्यावे. परंतु लोकांनी हे औषध स्वतः विकत घेऊन खाऊ नये.’

डेक्सॅमेथासोन औषध हे खास करून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्ट असणाऱ्या व्यक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. या औषधाबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले की, ‘ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर असलेल्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणारे हे पहिलेच औषध आहे. ही खूप चांगली बातमी आहे. मी ब्रिटन सरकार आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि इतर लोकांचे अभिनंदन करतो.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button