खुशखबर! अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छीमार बंदरांवर आता ‘सीसीटीव्ही’
मुंबई | महाईन्यूज
अवैध मासेमारी रोखण्यासाठी मच्छीमार बंदरांवर ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा बसविण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी दिलेले आहेत. त्याचबरोबर पोलीस व महसूल विभागाप्रमाणेच अवैध मासेमारीविरोधात कारवाई करण्याचे अधिकार मत्स्य व्यवसाय विभागाकडे घेण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
अवैध पर्ससीन मासेमारी, एलईडी मासेमारी, तसेच मच्छीमारांच्या विविध समस्यांसंदर्भात मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी, मत्स्य विकास आयुक्त, तसेच महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीसह काही संघटनांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या वेळी अवैध मासेमारी रोखण्यासाठी बंदरांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्याचे आदेश मंत्री शेख यांनी जारी केले. मासेमारी करताना दुर्घटनेत मच्छीमाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यासही त्यांनी सांगितलेले आहे.