breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

केजरीवाल घेणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ…

  दिल्ली | महाईन्यूज |

दिल्ली विधानसभेच्या निकालात पुन्हा एकदा दिल्लीकरांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यानांच पसंती दिली आहे… अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवते दिल्लीकरांनी त्यांना तिस-यांदा जिंकून दिलं आहे… तर, आज म्हणजे 16 फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल आज तिस-यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत…

2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही. भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी आज (16 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर होणार आहे. केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं गेलेलं नाही. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button