breaking-newsमहाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळे उद्या रायगड दौऱ्यावर जाणार

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड – नांदगाव येथे नुकसानग्रस्तांना घराचे पत्रे व इतर साहित्याचे वाटप राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्या (२७ जून ) खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे हे रायगड जिल्हयाच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत.

रायगड जिल्हयात चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना आधार मिळावा म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. ट्रस्टची मदत अधिक लोकांना मिळावी म्हणून रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे यामाध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पत्रे व इतर साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे हे छत्रपती शिवाजी विद्यालयाची आणि अंजुमन – ए – इस्लाम या बाधित शाळांची पाहणी करून मदत करणार आहेत. यावेळी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button