breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

माजी केंद्रीय मंत्र्याची जीभ घसरली; नवनीत राणांबाबत केलेल्या वक्तव्याने खळबळ

अमरावती: माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते (Subodh Mohite) यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली असून त्या बोगस आहेत असे वक्तव्य मोहिते यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. (Former Union Minister Subodh Mohite has criticized Amravati MP Navneet Rana)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज अमरावती ते संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी उच्च न्यायालय व एका वृत्तपत्राचा हवाला देत खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले. खासदार नवनीत राणा या बोगस आहेत, असे विधान मोहिते यांनी या कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अंबादेवी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद बैठकीदरम्यान मंचावर उपस्थिती असलेले विविध नेते भाषण करत होते. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुबोध मोहिते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करावे. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. येथे काम करण्याची संधी आहे.

खासदार राणा यांनी लोकांची दिशाभूल केली- मोहिते

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली आहे. माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी उच्च न्यायालय व एका वृत्तपत्रातील लेखाचा हवा ला देत अमरावती च्या खासदार नवनीत राणा बोगस असल्याची टिप्पणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button