breaking-newsपिंपरी / चिंचवड

खासदार श्रीरंग बारणे यांची पालिकेच्या कोविड 19 वॉर रुमला भेट

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोविड 19 वॉर रुमला भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच, वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन उपाययोजनांमध्ये बदल करा. ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढवा, अशा सूचना त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या.

आयुक्त हर्डीकर यांनी बारणे यांना वॉर रुममधून चालणा-या कामकाजाची माहिती दिली. सध्या उपलब्ध सुविधा आणि रुग्णांवरील उपचार पध्दतीची थोडक्यात माहिती आयुक्तांनी दिली. खासदार बारणे यांच्यासोबत शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर होते.

बारणे म्हणाले की, काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज पाचशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. आजपर्यंत 11 हजार 381 जणांना कोरोना झाला आहे. पालिका आणि खासगी लॅबच्या मदतीने दररोज तीन हजार चाचण्या केल्या जातात. यामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पालिकेने ऑक्सिजन बेडची जास्तीत-जास्त उपलब्धता करावी. खासगी रुग्णालयांवार पालिकेने देखरेख ठेवावी. किती बेड शिल्लक आहे, किती व्यापले आहेत. बिलाची जास्त आकारणी केली जात आहे का, कोरोनाच्या रुग्णांच्या तक्रारी काय आहेत, याची दखल घ्यावी, अशा सूचना बारणे यांनी केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button