breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आदित्य बिर्ला रुग्णालयांची चाैकशी करुन कारवाई करा – महापाैर उषा ढोरे

महापालिका आॅनलाईन महासभेत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले आदेश

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

थेरगांव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हाॅस्पीटलमधील कोविड-19 रुग्णांवरील उपचाराबाबत अनेक तक्रारी येवू लागल्या आहेत. रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने रुग्ण दगावल्याची साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे आदित्य बिर्ला हाॅस्पीटलची चाैकशी करुन दोषी आढळल्यास कडक कारवाई करा, असे आदेश महापाैर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना दिले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुलै महिन्यांची सर्वसाधारण सभा आज गुगल मीटद्वारे घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होते. महासभेत काही सदस्यांनी कोविड-19 रुग्णांवर उपचार करताना बिर्ला हाॅस्पीटलबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. तेथील रुग्णांवर उपचार करताना हेळसांड होत असून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जावू लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बिर्ला रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना उपचार नाकारला जात असल्याचेही म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने महापालिका रुग्णालयातील बेड संख्या अपुरी पडत आहे. त्यात शहरातील खाजगी रुग्णालये पैसे वाल्या खर्च करणा-या रुग्णांनाच बेड देत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे.

दरम्यान, आदित्य बिर्ला मेमोरियल हाॅस्पीटल रुग्णालय शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालक करीत नाही. महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजना, आयुष्यमान भारत योजना, तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना उपचारास टाळाटाळ करीत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आदित्य बिर्ला रुग्णांलयाची कसून चाैकशी करावी, संबंधित रुग्णालय दोषी आढळून आल्यास कडक कारवाईचे आदेश महापाैर ढोरे यांनी आयुक्तांना दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button