breaking-newsताज्या घडामोडीपुणे
खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक
पुणे : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक सुरू आहे.
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खा. वंदना चव्हाण, खा. गिरीश बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. अमोल कोल्हे यांच्या सह लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी- चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.