breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जेएनयूमध्ये अभाविपला हादरा देत डाव्यांचा विजय

दिल्ली –  दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी (अभाविप) परिषदेला मोठा हादरा देत डाव्यांनी विजय मिळविला आहे. या निवडणुकीत डाव्या संघटनांच्या ‘लेफ्ट युनिटी’ ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. विषेश म्‍हणजे ‘लेफ्ट युनिटी’ने विद्यार्थी संघाच्या चारही महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवला आहे.

अभाविप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे तर, ‘बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन’ (बापसा) तिसऱ्या स्थानावर आहे. शनिवारी झालेल्या तोडफोडीमुळे मतमोजणी थांबवण्यात आली होती, पण आज तणावपूर्ण परिस्थितीत मतमोजणी पूर्ण करण्यात आली.

विद्यार्थी संघाच्या चार महत्वाच्या पदांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. नंतर काल (शनिवारी)मतमोजणीला सुरूवात झाली असताना मतपेट्या पळवून नेण्याचा प्रयत्न झाला होता आणि तोडफोडही झाली होती. त्यानंतर मतमोजणी रद्द करण्यात आली होती. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी ही तोडफोड केली, असा आरोप डाव्या संघटनांकडून करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणानंतर आज तणापूर्ण परिस्थितीत मतमोजणी पूर्ण केली.

या निवडणुकीत डाव्या संघटनांचा एन. साई बालाजी याचा विजय झाला असून त्याने २१५१ मतं घेऊन ११७९ मतांनी विजय मिळवला तर, उपाध्यक्षपदासाठीही डाव्या संघटनांच्या सरिका चौधरी यांनी २५९२ मतं मिळवून १५७९ मतांनी विजय मिळवला. महासचिवपदासाठी डाव्या संघटनांचा एजाज अहमद राथेर ११९३ मतांनी विजयी झाला आहे तर संयुक्त सचिवपदावरही डाव्या संघटनांच्याच अमुथा जयदीपने २०४७ मतं मिळवत विजय मिळविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button