breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

खासदार चिखलीकर आणि आमदार बंब यांच्यात जुंपली

औरंगाबाद | नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि औरंगाबादच्या गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या सध्या चांगलीच जुम्पल्याचे पाहायला मिळत आहे. प्रशांत बंब ब्लॅकमेलर आहेत ते रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारी करतात आणि नंतर मांडवली करतात असा आरोप चिखलीकर यांनी केला.

याबाबत राज्याच्या प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात प्रशांत बंब यांच्या तक्रारीवर काहीही करू नये असे त्यांनी म्हटले आहे. तर याला प्रशांत बंब यांनी सडेतोड उत्तर दिले. तुमच्या पत्रातील भाषा वाचून तुम्हीच कंत्राटदारांचे जवळचे नातेवाईक असल्याचा दिसत आहात असा आरोप केला, आतापर्यंत जितक्या तक्रारी केल्या त्यातील एकही माघारी घेतली नाही आणि ब्लॅकमेलर असेल तर सिद्ध करा असे आवाहन प्रशांत बंब यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button